1880 पासूनचे सातबारा उतारे पाहा आता फक्त मोबाईलवर – अगदी मोफत!

तुम्हाला जमिनीशी संबंधित जुनी कागदपत्रं, जसं की सातबारा, फेरफार, खाते उतारे पाहायचं असल्यास, आता ही सगळी माहिती मोबाईलवरही पाहता येते. पूर्वीची कागदपत्रं हरवली किंवा खराब झाली असतील, तरी काळजीचं कारण नाही. कारण आता सरकारने ही सगळी माहिती ऑनलाइन उपलब्ध करून दिली आहे.

पूर्वी ही सुविधा फक्त ७ जिल्ह्यांमध्ये होती, पण आता १९ जिल्ह्यांमध्ये ही सेवा सुरू झाली आहे. यात अहमदनगर, अकोला, अमरावती, औरंगाबाद, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, जळगाव, लातूर, मुंबई उपनगर, नंदूरबार, नाशिक, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश आहे.

जर तुम्हाला जमिनीचा काही व्यवहार करायचा असेल, तर त्या जमिनीचा जुना इतिहास माहिती असणं खूप गरजेचं असतं. म्हणजे ती जमीन आधी कुणाची होती, नंतर कुणाकडे गेली, यात काय बदल झाले, ही सगळी माहिती सातबारा, फेरफार, खाते उतारे यामधून मिळते. ही माहिती 1880 पासून सरकारी कार्यालयांमध्ये ठेवलेली आहे. पण आता तीच माहिती इंटरनेटवरही पाहता येते.

ही माहिती पाहण्यासाठी खालील सोप्पी पद्धत आहे:

  1. सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमधून https://aapleabhilekh.mahabhumi.gov.in/erecords या वेबसाईटवर जा.
  2. तुम्हाला दोन पर्याय दिसतील – एक लॉगिन करण्याचा, आणि दुसरा नोंदणी करण्याचा.
  3. तुम्ही आधीच लॉगिन केलं नसेल, तर “New User Registration” वर क्लिक करा.
  4. तुमचं नाव, मोबाईल नंबर, ईमेल, जन्मतारीख, पत्ता, पिन कोड, तालुका, जिल्हा ही माहिती भरून नोंदणी पूर्ण करा.
  5. पासवर्ड तयार करून सबमिट करा.
  6. आता युजर आयडी आणि पासवर्डने लॉगिन करा.
  7. “Regular Search” वर क्लिक करा.
  8. पुढे एक नवीन विंडो उघडेल, जिथे कार्यालय, जिल्हा, तालुका, गाव यासारखे पर्याय दिसतील.
  9. ज्या ठिकाणची माहिती पाहायची आहे, ते सगळं नीट निवडा.
  10. त्या गावात जे कागदपत्रे उपलब्ध असतील, तीच तुम्हाला दिसतील.
  11. शेवटी, सर्वे नंबर टाका आणि “Search” बटणावर क्लिक करा.
  12. त्या नंतर, संबंधित कागदपत्र तुमच्या मोबाईलवर दिसेल.

ही पद्धत वापरून तुम्ही तुमच्या गावातील किंवा कुठल्याही जमिनीची जुनी माहिती सहज बघू शकता. यामुळे सरकारी कार्यालयात जायचं टाळता येतं आणि वेळही वाचतो. ही सेवा सध्या काही निवडक जिल्ह्यांमध्ये आहे, पण भविष्यात संपूर्ण महाराष्ट्रात लागू होईल.

Leave a Comment