खाद्यतेल खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! सरकारकडून दर कमी करण्याचा निर्णय

आपण रोज जेवताना वापरतो ते खाद्यतेल आता स्वस्त होण्याची शक्यता आहे. कारण भारत सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सरकारने जे कच्चं तेल आपण परदेशातून आणतो त्यावर लागणारा कर (custom duty) कमी केला आहे. आधी हा कर २०% होता, पण आता तो फक्त १०% केला आहे. म्हणजेच आता ते तेल भारतात आणताना कमी पैसे लागणार आहेत.

सरकारच्या या निर्णयामुळे खाद्यतेल स्वस्त होईल असा विश्वास आहे. याचा फायदा थेट ग्राहकांना म्हणजे आपल्याला मिळणार आहे. या निर्णयामुळे खाद्यतेल १०% पर्यंत स्वस्त होऊ शकतं. त्यामुळे महागाई थोडी कमी होईल आणि सर्वसामान्य लोकांना थोडा दिलासा मिळेल.

या निर्णयामुळे भारतात तयार होणारं तेल म्हणजेच रिफाइंड तेल जास्त प्रमाणात तयार होईल. देशातल्या तेल उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना जास्त काम मिळेल. यामुळे शेतकऱ्यांना त्यांचं तेलबियांचं योग्य पैसे मिळतील आणि ग्राहकांनाही स्वस्त दरात तेल मिळेल.

सरकारच्या बैठकीत खाद्यतेल तयार करणाऱ्या मोठ्या कंपन्यांनी भाग घेतला होता. या बैठकीत असं सांगितलं गेलं की, सरकारने जो कर कमी केला आहे, त्याचा संपूर्ण फायदा ग्राहकांना मिळायला हवा. त्यामुळे सरकारने सर्व तेल कंपन्यांना सूचना दिल्या आहेत की त्यांनी तेलाच्या किंमती कमी कराव्यात.

पाम तेल हे भारतात मोठ्या प्रमाणात वापरलं जातं. सरकारने असंही सांगितलं आहे की, कमी करामुळे पाम तेल आणण्याची मागणी वाढेल. त्यामुळे भारतात तयार होणारं तेल अधिक चांगल्या प्रकारे तयार करता येईल आणि याचा फायदा देशाच्या उद्योगांना आणि शेतकऱ्यांना मिळेल.

या सगळ्या निर्णयामुळे खाद्यतेलाचा भाव कमी होईल आणि घर चालवणाऱ्या गृहिणींना याचा मोठा फायदा होईल. तसेच, शेतकऱ्यांना चांगला भाव मिळेल आणि ग्राहकांना स्वस्त दरात तेल मिळेल. त्यामुळे सरकारच्या या निर्णयाचं सर्वजण स्वागत करत आहेत.

Leave a Comment